मुंबई : पेटीएम (Paytm) सारख्या दिसणाऱ्या अॅपमधून फसवणूक करणाऱ्या एका टोळीला साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकला आहेत. पेटीएम सारख्या दिसणाऱ्या Spoof पेटीएम अॅपमधून ही टोळी फसवणूक करत होती.  साकीनाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हॉटेलमध्ये भाड्याने राहण्यासाठी या तीन लोकांनी रूम बुक केली होती. राहण्याचे या तिघांचे पन्नास हजार रुपयापर्यंत बिल आले होते. यावेळी या तिघांनी हॉटेल मॅनेजरला Spoof पेटीएम अॅपमधून पेमेंट केल्याच्या सांगितले आणि निघून गेले. 


जेव्हा हॉटेल मालकाने बँकेमध्ये चौकशी केली आणि युट्युबवर Spoof पेटीएम अॅपच्या फसवणुकीचा व्हिडीओ पाहिला. तेव्हा त्याच्या लक्षात आला की आपलीसुद्धा फसवणूक झाली आहे. त्यानंतर लगेच हॉटेल मालकाने यासंबंधी  साकीनाका पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हॉटेल मालकाच्या तक्रारीनंतर साकीनाका पोलिसांनी आरोपींचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून अवघ्या दोन तासांमध्ये या तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या. मोहम्मद खालील उर्फ अनस अब्दुल कलाम शेख (वय 23 वर्ष) इब्राहीम समसुद्दिन काजी (वय 27 वर्ष) आणि आयुष सुहास जगदाळे अशी पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी मूळचे उत्तर प्रदेशमधले राहणारे आहेत.


मुंबईत मोठ्या संख्याने लोक पेटीएममधून पेमेंट घेतात. त्यामुळे तुम्ही जर पेटीएम मधून पैसे घेत असाल तर सावधानता बाळगणे गरजेचे आहे. कारण असे फसवणूक करणारे लोकसुद्धा असू शकतात. खोटी माहिती सांगून हे फसवणूक करु शकतात, त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे. दरम्यान, या आरोपींनी Spoof पेटीएम अॅपच्या नावाने मुंबईत अजून कुठे-कुठे फसवणूक केली आहे. या टोळीमध्ये यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याची चौकशी साकीनाका पोलीस करत आहेत. दरम्यान या प्रकरणाचा तपास साकीनाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस बळवंत देशमुख करत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: