नोटाबंदीमुळे नव्हे, तर उत्पादन वाढल्याने शेतकऱ्याचे नुकसान: सदाभाऊ खोत
एबीपी माझा वेब टीम | 03 Jan 2017 07:46 AM (IST)
नवी मुंबई: नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने शेतीमालाचे भाव देखील पडले आहेत. पण यासाठी नोटबंदीमुळं नव्हे, तर उत्पादन वाढल्यानं भाव पडून शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. नोटबंदीनंतर नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटला फटका बसला. नवी मुंबईच्या मार्केटमध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यासह फळांचीही आवक होते. मात्र आता अवघ्या 2 ते 3 रुपये किलोनं भाजीपाला विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यामुळं आधी शेतमालाच्या दरासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणाऱ्या सदभाऊंचा आवाज मंत्री झाल्यावर नरमला का? असा सवाल विचारला जातो आहे.