मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे शिवसेना नेत्यांसोबत आर्थिक संबंध असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि दोन शिवसेना नेत्यांचे आर्थिक संबंध आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. ठाण्यातील एका शिवसेना नेत्याबरोबर सचिन वाझे यांची बांधकाम क्षेत्रात भागीदारी असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. मुंबई पोलीस दलात एक अधिकारी असून सचिन वाझे यांच्याकडे हजारो कोटींची संपत्ती आली कशी? असा घणाघाती सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.


Sachin Vaze : सचिन वाझेंनी 'त्या' रात्री पीपीई किट नाही, तर पांढरा कुर्ता घातलेला; NIAच्या सूत्रांची माहिती 


मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटक ठेवल्या प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेर स्फोटकं ठेवल्याचा आरोप लागल्यानंतर आता सचिन वाझे यांच्या संपत्ती वर सवाल उपस्थित केले जात आहेत. किरीट सोमय्या यांनी वाझेंवर गंभीर आरोप लावत शिवसेना नेते संजय माशेळकर आणि विजय गवई या दोघांची सचिन वाझेंशी व्यवसायिक भागीदारी असल्याचं सांगितलं.


सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या ताब्यात; कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त


नेमकं कुठल्या कंपन्यांमध्ये सचिन वाझे हे भागीदार असल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं  
मल्टीबिल्ड इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड.
टेकलीगल प्रायव्हेट सोल्युशन्स लिमिटेड..
डिजी नेक्स्ट मल्टीमिडया लिमिटेड अँड अदर्स..


तसेच इतर अजून काही कंपन्यांमध्ये सचिन वाझे भागीदार असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.


पोलीस अधिकारी असून इतकी संपत्ती कशी? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला. मात्र 2004 मध्ये ख्वाजा युनूस प्रकर्णी निलंबित झाल्यानंतर सचिन वाझे यांनी स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी काही व्यवसाय सुरू केले. त्यातून सचिन वाझे यांनी किती संपत्ती गोळा केली हे अद्याप कळलेले नाही.


सचिन वाझे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत.  अटक केल्यानंतर आता सचिन वाझे यांच्या संपत्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जर या संदर्भात आर्थिक तपास यंत्रणांनी भविष्यात तपास हाती घेतला तर निश्चितच सचिन वाझे यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते.