गणेश विसर्जनानिमित्त चालवली जाणारी पहिली विशेष लोकल चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने डाऊन मार्गावर रात्री 1.15 वाजता सोडण्यात येईल, तर शेवटची विशेष लोकल रात्री 3.20 वाजता सोडण्यात येईल. विरारवरुन चर्चगेटच्या दिशेने अप मार्गावर पहिली विशेष लोकल 12 वाजून 15 मिनिटांनी सोडण्यात येईल, तर शेवटची विशेष लोकल रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी सोडण्यात येईल.
विशेष लोकल वेळापत्रक :
--------------------------
चर्चगेट ते विरार डाऊन
पहिली लोकल रात्री 1.15 वाजता
दुसरी लोकल रात्री 1.55 वाजता
तिसरी लोकल रात्री 2.25 वाजता
चौथी लोकल रात्री 3.20 वाजता
-----------------------------
विरार ते चर्चगेट अप
पहिली लोकल रात्री 12.15 वाजता
दुसरी लोकल रात्री 12.45 वाजता
तिसरी लोकल रात्री 1.40 वाजता