मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पश्चिम आणि मध्ये रेल्वेवर पुलांच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. खासदार निधितून सचिनने ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर सचिनने रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून पुलांच्या दुरुस्तीसाठी खासदार निधितून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
यामुळे आता सचिनच्या खासदार निधीतून पश्चिम आणि मध्य रेल्वेला अनुक्रमे एक-एक कोटी रुपये मिळणार आहेत. रेल्वेनेही पुलांच्या दुरुस्तीचं आणि ऑडिटचं काम सुरु केलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच प्रशस्त रेल्वे फूट ओव्हर ब्रिज मिळतील, अशी अपेक्षा आहे.