भिवंडीत 40 वर्षीय महिलेची क्रूर हत्या, आरोपींचा शोध सुरु
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2017 10:34 PM (IST)
वंशी कोरडे (४०) असं या मृत महिलेचे नाव असून ती भिवंडीतील टेमघरमध्येच मजुरी करत असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
भिवंडी : भिवंडीतील टेमघर परिसरात 40 वर्षीय शेतमजूर महिलेची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेच्या शरीराचे अत्यंत क्रूरपणे चार तुकडे करुन पोत्यात भरण्यात आले होते. वंशी कोरडे (४०) असं या मृत महिलेचे नाव असून ती भिवंडीतील टेमघरमध्येच मजुरी करत असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. या महिलेच्या हत्येनंतर तिचे तुकडे करुन ते झाडाझुडपात फेकण्यात आले होते. याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्या करुन पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांची 4 पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. मृत महिला पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे राहणारी असल्याची माहिती समजते आहे.