महिलेला पाहून लोकलमध्ये अश्लील चाळे करणारा अटकेत
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 23 Oct 2017 06:07 PM (IST)
मुंबईच्या सीएसएमटीवरुन हार्बर मार्गावर सुटलेल्या लोकलमध्ये महिलेला पाहून अश्लील वर्तन केलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : मुंबईच्या सीएसएमटीवरुन हार्बर मार्गावर सुटलेल्या लोकलमध्ये महिलेला पाहून अश्लील वर्तन केलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. कृपा बोधेबा पटेल असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. शनिवार 21 ऑक्टोबर रोजी सीएसएमटीवरुन एक महिला हार्बर मार्गवरुन प्रवास करत होती. ही महिला लेडिज कम्पार्टमेंटमधून प्रवास करत होती. यावेळी या कम्पार्टमेंटला लागूनच असलेल्या जनरल डब्यातील एका विकृत व्यक्तीने महिलेला पाहून अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेने या विकृत माणसाचं मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर मध्य रेल्वे पोलिसांनी महिलेने दिलेला व्हिडीओ आणि सीसीटीव्ही सहाय्यानं पोलिसांनी शोध सुरु केला. आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास आरोपीला मस्जिद बंदर स्टेशन परिसरात बेड्या ठोकल्या. कृपा बोधेबा पटेल असं अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण, रविवारी 22 ऑक्टोबर रोजी देखील अशीच एक घटना समोर आली आहे. छेडछाडीच्या भीतीनं मुंबईत 13 वर्षांच्या विद्यार्थिनीने धावत्या लोकलमधून उडी मारली. यामध्ये विद्यार्थिनीच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पायल कांबळे असं या घटनेत जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे. संबंधित बातम्या छेडछाडीच्या भीतीने सीएसएमटीजवळ विद्यार्थिनीची लोकलमधून उडी