मुंबई : सीएसएमटी पूल दुर्घटनेला अनेक तास उलटून गेल्यानंतरही महापालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेने चकार शब्द काढला नाही. मुंबईचा कैवार घेणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ना घटनास्थळाकडे फिरकले, ना आदित्य ठाकरे यांनी जखमींची विचारपूस केली. आता या दुर्घटनेसाठी मुंबईतील वाढती गर्दी आणि वेगवेगळ्या यंत्रणांकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात पूल दुर्घटनेबाबत भाष्य केलं आहे.


काय म्हटलं आहे 'सामना'त?
"मुंबईचा अनियंत्रित विस्तार, प्रचंड लोकसंख्येचा येथील नागरी आणि इतर सुविधांवर पडणारा ताण, त्यामुळे बिघडलेले शहर नियोजन अशा अनेक कारणांमुळेच मुंबईची अवस्था सध्या बिकट झाली आहे. पुन्हा या नागरी सेवासुविधा, इतर व्यवस्था, त्यांची दुरुस्ती-देखभाल आणि जबाबदारी हेदेखील एक त्रांगडेच झाले आहे. मुंबई महापालिका, राज्य सरकार, म्हाडा, एमएमआरडीए, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे, नॅशनल हायवे ऍथॉरिटी वगैरे अनेक प्रशासन यंत्रणांची कामे एकाच वेळी या महानगरीत सुरु असतात. मात्र 'अनेक पायांची शर्यत' झाल्याने ती रखडतात. त्यातून मग एखादी दुर्घटना घडते आणि जबाबदारी आणि दोषारोपांचे बोट एकमेकांकडे दाखवले जाते."

CSMT पूल दुर्घटनेतील जखमींची विचारपूसही नाही, उद्धव ठाकरे प्रचारासाठी अमरावती दौऱ्यावर

मुंबईकर वाऱ्यावर, उद्धव ठाकरे दौऱ्यावर
मुंबईतील सीएसएमटी स्टेशनजवळ 14 मार्च रोजी संध्याकाळी मुंबई महापालिकेचा पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण जखमी झाले. मात्र मुंबईचे कारभारी समजणाऱ्या उद्धव ठाकरेंनी घटनास्थळाला भेट देण्याचं किंवा जखमींची विचारपूस करण्याचं सौजन्य दाखवलं नाही. ज्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकत आहे, त्याच महापालिकेच्या निष्काळजीमुळे पुलाचा भाग कोसळल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. अशा परिस्थितीत उद्धव आणि आदित्य यांनी केलेलं दुर्लक्ष असंवेदनशीलतेचं मानलं जात आहे.

पूल दुर्घटनेबाबत चकार शब्द नाही
शिवसेना-भाजप युतीच्या संयुक्त प्रचारसभेला उद्धव यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली आहे. मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतले, ते राष्ट्रहिताचे होते, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. मात्र पूल दुर्घटनेविषयी चकार शब्दही काढला नाही. निवडणुका तोंडावर आल्याने प्रचाराला जाण्यात काहीच चूक नाही. मात्र ज्या 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे राहतात तिथून घटनास्थळ फक्त 18 किलोमीटरवर आहे. परंतु मतांच्या बेगमीसाठी उद्धव ठाकरेंनी तब्बल साडेपाचशे किलोमीटरवर असलेली अमरावती जवळ केली.

VIDEO | उद्धव ठाकरेंची सभेत बालाकोटची उजळणी मात्र मुंबईकरांची आठवण नाही 



संबंधित बातम्या

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी पहिली कारवाई, दोन अधिकारी निलंबित, अन्य दोघांची चौकशी

सहा मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या पुलाचं पाडकाम सुरु, जेसीबीच्या साहाय्याने तोडकाम, लोखंडी सांगाडाही हटवणार

सीएसएमटी फुटओव्हर ब्रिज दुर्घटनेसंदर्भात हायकोर्टात याचिका

सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघलांचा पळ, तर आयुक्त अजॉय मेहतांचा पत्ता नाही

पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार, भाजप नेत्याचं संतापजनक वक्तव्य

CSMT पूल दुर्घटना : वडिलांनंतर घराचा आधार झालेला मुलगाही गेला, तपेंद्र सिंगचा मृत्यू

सीएसएमटी पूल दुर्घटना : कुणाची जबाबदारी हे संध्याकाळपर्यंत ठरवा, मुख्यमंत्र्यांचे महापालिका आयुक्तांना आदेश

सीएसएमटी पादचारी पुलाच्या जन्मापासून आजपर्यंतची कहाणी

CSMT पूल दुर्घटना : नाईट शिफ्टला निघालेल्या डोंबिवलीच्या तीन नर्स परतल्याच नाहीत...