मुंबई : सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. फडणवीस यांच्याविरोधात गृहखात्यातूनच षडयंत्र रचले जात असल्याचं सामनातून म्हटलं आहे. डीएसकेप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यावरील कारवाई ही फडणवीसविरोधी गटाची चाल असल्याचं सामनातून म्हटलं आहे .
मराठे यांची अटक म्हणजे सुस्तावलेल्या गृहखात्याचे वाभाडे आहेत असंही सामनातून म्हणण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून गृहखाते कोण चालवत आहे, हा पहिला प्रश्न आणि मुख्यमंत्र्यांविरोधात कारस्थाने कोण रचित आहे, हा दुसरा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दुश्मनांनी गृहखात्यावर ताबा मिळवून काही कारवाया केल्या असतील तर तो प्रकार धक्कादायक असल्याचे सामनात म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भोवती ‘कडक’ आणि अभेद्य असे सुरक्षाकवच आहे व पोलीस चोख बंदोबस्त करत आहेत, पण गृहखातेच पोखरले गेले आहे व मुख्यमंत्र्यांचे दुश्मन त्यात घुसले आहेत ही बातमी झोप उडवणारी आहे. गृहखात्यात दहशतवादी घुसले आहेत की नक्षलवादी याचा शोध आता घ्यावा लागेल. कारण गृहखात्यात मुख्यमंत्र्यांचे ‘वैरी’ घुसले असतील तर हा धोका फक्त मुख्यमंत्र्यांनाच नसून संपूर्ण राज्याला असल्याचं म्हणत शिवसेनेने याबाबत चिंता व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांविरोधात गृहखात्यातूनच षडयंत्र- शिवसेना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jun 2018 07:51 AM (IST)
सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. फडणवीस यांच्याविरोधात गृहखात्यातूनच षडयंत्र रचले जात असल्याचं सामनातून म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -