मुंबई : ऑन लाईन रेडिओ टॅक्सींना इतर टॅक्सी संघटनांचा वाढता विरोध आणि महाराष्ट्रातील ऑटो-टॅक्सीचे भाडे सुत्र ठरवण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या समितीनं आता ऑनलाईन सर्व्हेद्वारे सर्वसामान्य लोकांची मत मागवली आहेत.


यासाठी तुम्हाला राज्य शासनाच्या www.transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन केवळ एक फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्मही अतिशय साधा आणि सोपा आहे. यात तुम्हाला केवळ हो किंवा नाही अशी टिकमार्क करून तुमची मतं नोंदवायची आहेत. 15 मे पर्यंत राज्यातील सर्वसामान्य नागरीक हा ऑनलाईन फॉर्म भरु शकतात.

जनतेच्या शिफासशी ही लक्षात घेऊन ही समिती जून 2017 च्या अखेरपर्यंत राज्य सरकारकडे आपला अंतिम अहवाल सुपूर्द करणार आहे. हा फॉर्म मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऑटो-टॅक्सी चालकांचे कौशल्य, ग्राहकांशी त्यांची असलेली वागणूक, त्यासंदर्भातल्या शिफारशी करण्यासाठीदेखील या सर्व्हेचा उपयोग होणार आहे.

संबंधित बातम्या :

काळ्या-पिवळ्या टॅक्सीचं घरबसल्या बुकिंग, लवकरच अॅप