मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याचा लिलाव करण्यात आला. यानिमित्तानं बाप्पाचं सोनं खरेदी करण्याची मोठी पर्वणीच होती. जवळपास अडीच किलो सोन्याच्या लिलावाला भक्तांनी मोठी गर्दी केली होती.


अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर काल सिद्धीविनायक मंदिरात गणेश भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव झाला. यावेळी जवळपास 323 प्रकारच्या दागिन्यांचा लिलाव झाला. यात चेन, हार, अंगठी, ब्रेसलेट, सोन्याची बिस्किटे आदींचा समावेश आहे.

या लिलावात जयेश पाठक या गणेशभक्ताने 1 लाख 55 हजारांची सर्वाधिक बोली लावून लिलावातील सोन्याची नाण्यांची खरेदी केली.

जयेश गेल्या 27 वर्षांपासून रोज सिद्धीविनायकाच्या दर्शनाला येतात. 2009 पासून ते या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेऊन काही ना काही खरेदी करतात. यावेळी त्यांनी या लिलावात सोन्याची नाणी खरेदी केली.