| मार्ग | रोप वेचं अंतर | प्रस्तावित खर्च |
| संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते ठाणे घोडबंदर रोड | 11 किमी | सुमारे १२०० ते १५०० कोटी रुपये |
| वाशीच्या सागर विहार जेटी ते घाटकोपर बस डेपो | 8 किमी | 800 ते 900 कोटी रुपये |
| भिवपुरी रोड स्थानक ते माथेरानमधील गार्बेट लॉर्डस गार्डन | 3.5 किमी |
मुंबईकर आता हवेतूनही प्रवास, लवकरच 'रोप वे' दिमतीला
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 07 Oct 2016 10:18 AM (IST)
मुंबई: उपनगरांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकारक आणि आरामदायी करण्यासाठी एमएमआरडीएनं आता 'रोप वे'चा पर्याय समोर ठेवला आहे. पाश्चात्य देशांप्रमाणेच सर्वांचंच आकर्षण असलेले 'रोप'ने आता मुंबई ते घाटकोपर आणि बोरीवली ते ठाणे दरम्यान उभारण्याची योजना एमएमआऱडीएनं हाती घेतली आहे. मेट्रो, मोनोसारख्या प्रकल्पांमधून लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला. मात्र एवढ्यावरच न थांबता कमी वेळेत प्रवासाची सोय उपलब्ध करण्यासाठी 'रोप वे'चा पर्याय एमएमआरडीएनं हाती घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकल्पाची संकल्पना मांडली असून त्यांच्याच सूचनेनुसार तीन प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. या मार्गांवरुन रोप वेने प्रवास
पाहा व्हिडीओ