वसई-नालासोपाऱ्यादरम्यान रेल्वे रुळावर रॉड, सुदैवानं अपघात टळला
एबीपी माझा वेब टीम | 12 Jun 2017 10:26 AM (IST)
वसई : वसई-नालासोपारादरम्यान रेल्वे रुळावर रॉड सापडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र मोटरमननं दाखवलेल्या प्रसंगावधानानं मोठी दुर्घटना टळली आहे. शनिवारी रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी ही घटना अचोले इथं घडली आहे. वसईवरुन चर्चगेटच्या दिशेनं निघालेल्या स्लो लोकलच्या चाकामध्ये अचोलेजवळ शनिवारी रात्री साडेआठ वाजता 8 फुटांचा लोखंडी रॉड सापडला. लोकल स्लो असल्यानं मोटरमननं लगेच लोकल थांबवली. नितीन चंदनशिव असं या मोटरमनचं नाव आहे. शनिवारी रात्री दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. कारण लोकल जास्त वेगात असती तर तीचे डबे रुळावरुन घसरले असते. सीएसटीजवळ रेल्वे रुळावर लोखंडी रॉड, घातपाताचा डाव उधळला दरम्यान अचोले परिसरात शनिवारी काम सुरु होतं. त्यामुळे कुठल्या कामगारानं हा रॉड ठेवला का याची चौकशी आरपीएफ आणि जीआरपी करत आहेत. याआधीही दिव्यात आणि पनवेलजवळ रेल्वे ट्रॅकवर लोखंडी रॉड आढळला होता. त्यामुळे शनिवारी सापडलेल्या रॉडमागे कुठला घातपात होता का याचाही तपास सुरु आहे. संंबंधित बातम्या: दिवा रुळ घातपात प्रकरणी पाच जण ताब्यात, मुंब्रा पोलिसांची कामगिरी