मुंबई : राज्याच्या बहुतांश जिह्यात काल रात्रीपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरु असून, मराठवाड्यात काल रात्रीपासून पावसाला सुरुवात आहे. काल रात्रभर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे. दुसरीकडे जालना, लातूर, परभणी आणि औरंगाबाद, मुंबई, कोकणच्या अनेक भागातूनही पावसाने दमदार हजेरी लावली आहे.


मराठवाड्यातील लातूर आणि जालन्यात काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून, यामुळे बळीराजा सुखावला आहे. काल रात्रीपासून पडलेल्या पावसानंतर शेतकऱ्यांची पेरण्यांसाठीची लगबग सुरु झाली आहे.

दुसरीकडे गेल्या २-३ दिवसांपासून कोकणमध्ये पावसाचा जोर कायम आहे. काल रात्रभर कोकणातील अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदा, सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ल्यामध्ये पाऊस चांगला झाला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात पावसानं गेल्या तासभरापासून दमदार हजेरी लावली. आजही मुंबईतल्या जेव्हीएलआरवर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र होतं. त्यामुळे रविवारच्या दिवशीही लोकांना वाहतूककोंडीला सामोरं जाव लागलं.