मुंबई : महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालं. सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढत, सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तत्वत: मान्य केली. मात्र, 'तत्वत:' शब्दामुळे अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.


त्यात, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटलं, “सरकारने तत्वतः सरसकट कर्जमाफी केली आहे. शिवाय, त्याला काही निकषही आहेत. त्यामुळे या तीन शब्दांविषयी चिंता वाटते. त्यामुळे सरकारने सरसकट, तत्वतः आणि निकष यांची व्याख्या स्पष्ट करावी.”

संबंधित बातमी : सरसकट कर्जमाफी तत्वतः मान्य, शेतकरी आंदोलनाला ऐतिहासिक यश

आता चंद्रकांत पाटील यांनी कर्जमाफीबद्दल सांगताना वापरलेल्या ‘तत्वत:’ शब्दावरुन सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस पडत आहे. ‘तत्वत:’ शब्द वापरुन सरकारवर विनोदी अंगाने टीका केली जात आहे.

सोशल मीडियावरील निवडक पोस्ट :












https://twitter.com/ManojMhatre_/status/873979619807969280

https://twitter.com/pramodpatilmns/status/873939494545883136

https://twitter.com/DrVimalMapariIN/status/873907473924620289