मुंबई : ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय’ असं म्हणत मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर, महापालिकेने आरजे मलिष्कावर कारवाईस सुरुवात केली आहे. त्यामुळे सगळी माध्यमं मलिष्काच्या बाजूने उभी राहिली आहेत.


सध्या न्यूयॉर्क दौऱ्यावर असलेल्या मलिष्काने तमाम माध्यमांचे आभार मानले आहे. तिने ट्विटरवर माध्यमांचे आभार मानणारा व्हिडीओ अपलोड केला आहे.

https://twitter.com/mymalishka/status/887718212804251655

मलिष्काने कालच (बुधवारी) ट्वीट करुन, “मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही खूप चांगले आहात. मुंबई, तू बेस्ट आहेस. मला तुझ्यावर भरोसा आहे”, असं म्हटलं होतं.

https://twitter.com/mymalishka/status/887505519090569218

आरजे मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या, बीएमसीकडून नोटीस

मुंबई मनपाने मंगळवारी मलिष्काच्या वांद्र्यातील पाली नाका इथल्या सनराईज इमारतीमधील घरात तपासणी केली. यावेळी घरातील शोभेच्या कुंडीखालील डिशमध्ये साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. यानंतर महापालिकेने मलिष्काला नोटीस बजावली आहे.

याप्रकरणी मलिष्कावर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे.

रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी

‘मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय’ या गाण्यामुळे चर्चेत आलेली आरजे मलिष्का हिच्यावर शिवसेना अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहे. मुंबई महापालिकेची बदनामी केल्याप्रकरणी 93.5 रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे.

शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमेय घोले यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेऊन रेडिओ वाहिनीवर कायदेशीर कारवाई करुन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

मुंबई, मला तुझ्यावर भरोसा आहे, आरजे मलिष्काचं ट्वीट

मुंबईत पाऊसच जोरदार पडतो, पालिका काय करणार : उद्धव ठाकरे

शिवसेनेकडून आरजे मलिश्कावर टीका करणारं गाणं

मुंबई, तुला बीएमसीवर भरवसा नाय काय?,  आर.जे. मलिश्काचं गाणं