मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी वेळेआधीच जाहीर करण्यात आली आहे.

वेळापत्रकानुसार ही यादी आज (20 जुलै) संध्याकाळी पाच वाजता जाहीर होणं अपेक्षित होतं. परंतु दुसरी यादी बुधवारी रात्रीच जाहीर करमअयात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आज दिवसभर यादी पाहता येणार आहे.

विशेष म्हणजे अकरावी प्रवेशाची पहिली यादी उशिरा जाहीर करण्यात आली होती. ही चूक दुरुस्त करत शिक्षण मंडळाने दुसरी यादी एक दिवसआधीच जाहीर केली. विद्यार्थ्यांना लवकर यादी पाहता यावी म्हणून बुधवारी रात्रीच जाहीर केली, असं शिक्षण उपसंचालकांनी सांगितलं.

दरम्यान, दुसऱ्या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना 21 जुलै ते 24 जुलै (सकाळी 10 ते संध्याकाळी 5) या काळात प्रवेश घेता येणार आहे.

अकरावीच्या पहिल्या फेरीनंतर जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळूनही एकतर प्रवेश रद्द केला होता किंवा प्रवेश घेतलाच नव्हता. या विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे या दुसऱ्या यादीत नावडीचं कॉलेज मिळालं तरी प्रवेश घेऊन ठेवा, नाहीतर पुन्हा प्रवेश रद्द होण्याची भीती आहे.

संबंधित बातम्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर


अकरावी प्रवेशाची पहिली यादी रात्री 12 वाजता जाहीर होणार


अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर होणार


अकरावी प्रवेश : पुण्यातल्या नामांकित कॉलेजमधील कट ऑफमध्ये वाढ


अकरावी प्रवेश : इंटिग्रेटेड कॉलेजबाबत शिक्षण विभागाचा महत्त्वाचा इशारा