डोंबिवलीत भरदिवसा महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 18 Aug 2017 03:21 PM (IST)
मात्र दोन बाईकस्वारांनी प्रसंगावधान राखत पाठलाग करुन रिक्षाचालकाला पडकलं. मानपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतच आज दुपारी ही घटना घडली.
प्रातिनिधीक फोटो
NEXT PREV
डोंबिवली : रिक्षाचालकाने भर दिवसा महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. यावेळी दोन धाडसी तरुणांनी रिक्षाचा पाठलाग करुन या महिलेची सुटका केली. मानपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतच आज दुपारी ही घटना घडली. डोंबिवली पूर्वेतील स्टार कॉलनीत राहणाऱ्या मनीषा राणे स्टार कॉलनीतून रिक्षाने स्टेशनला जाण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी शंकर विसलवाथ नावाच्या रिक्षाचालकाने त्यांना स्टेशनला नेण्यास नकार दिला. पुढे गेल्यावर हाच रिक्षाचालक प्रवाशांची वाट पाहात थांबलेला दिसल्याने राणेंनी त्याला जाब विचारला. यावेळी शंकरने राणे यांची मैत्रिण अमिता हेदळकर यांना रिक्षात ओढत रिक्षा पळवली. मनीषा राणेंनी आरडाओरडा केल्याने तिथून जाणाऱ्या दोन बाईकस्वारांनी रिक्षाचा पाठलाग करत या चालकाला पकडलं आणि अमिता यांची सुटका केली. यानंतर त्याला मानपाडा पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून त्यानंतर रिक्षाचालक शंकरला अटक करण्यात येणार आहे. परंतु या घटनेवरुन महिला सुरक्षेचा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.