मुंबई: जे जे रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणप्रकरणी आज सायन रुग्णालयातील डॉक्टरही एक दिवसाच्या सामूहिक रजेवर गेले आहेत.
जे जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे.
रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डची सुरक्षा तातडीनं वाढवावी यामागणीसाठी संप कायम ठेवण्यात आला आहे. संपादरम्यान कुठलीही अत्यावश्यक सेवा प्रभावित होऊ देणार नाही, संप लांबल्यास आम्ही समांतर ओपीडी सुरु करु, अशी माहिती मार्डचे प्रवक्ते अमोल हेकरे यांनी दिली.
मात्र या संपामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होतेय.
काल मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी कँडल मार्च काढला.
निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड आणि वैद्यकीय शिक्षण संचलनालयाचे सहसंचालक प्रकाश वाकोडे यांच्यासोबत बैठकही झाली. मात्र आश्वासनापलीकडे काहीही हाती लागलं नसल्याची खंत डॉक्टरांनी बोलून दाखवली.
जे जे रूग्णालयामध्ये अत्यावस्थ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली होती, ज्यात 2 डॉक्टर जखमी झाले आहेत.
याबाबत जे जे मार्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतलं आहे.
संबंधित बातमी
जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप सुरुच
जे जे हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण