मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील तीन कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. तसेच नवीन 13 सदस्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. मात्र ज्या सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला ते नाराज असल्याचं दिसून आलं आहे.


पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी डच्चू दिलेले मंत्री गैरहजर होते. कालच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सहा मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन आणि अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे, उद्योग आणि खणीकर्म, पर्यावरण तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा समावेश आहे.


अकार्यक्षमता म्हणून कुणाला वगळण्यात आलेलं नाही. मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची होती. तसेच प्रादेशिक गणितं लक्षात घेत काही बदल केल्याचं मुख्यमंत्री म्हटलं होतं. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर कही खुशी, कही गम दिसून येत आहे.


प्रकाश महेता आणि विष्णू सावरा यांच्या कारभारावर अनेकदा बोटं उठली होती. मेहता यांच्यामुळे मागील अधिवेशनात मुख्यमंत्री देखील अडचणीत आले होते. तर सवरा यांच्या आदिवासी विभागावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते.


मंत्रिमंडळात 13 नवीन सदस्यांची वर्णी


कॅबिनेट मंत्री


राधाकृष्ण विखे पाटील - गृहनिर्माण
जयदत्त क्षीरसागर - रोजगार हमी आणि फलोत्पादन
आशिष शेलार - शालेय शिक्षण आणि क्रीडा व युवक कल्याण
संजय कुटे - कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण
सुरेश खाडे- सामाजिक न्याय
अनिल बोंडे - कृषी
अशोक उईके - आदिवासी विकास
तानाजी सावंत - जलसंधारण


राज्यमंत्री


योगेश सागर- नगरविकास
अविनाश महातेकर - सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
संजय भेगडे- कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
परिणय फुके - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने आणि आदिवासी विकास
अतुल सावे - उद्योग आणि खणीकर्म, अल्पसंख्याक विकास व वक्फ


आणखी वाचा