मुंबई : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणिअंधेरी येथे पूल काही भाग कोसळल्याच्या घटनेमुळे मुंबईकरांची दुहेरी कोंडी झाली. अनेक मुंबईकरांना आपल्या नियोजित स्थळी पोहोचता आले नाही. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षेस पोहचू शकले नाहीत, त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाचे स्थानापन्न उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नव्याने घेण्यात येणाऱ्या या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे आज मुंबई विद्यापीठाची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत आज मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार पावसामुळे सायन, कुर्ला रेल्वेस्थानकाजवळील रुळावर पाणी साचलं होतं. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. तर दुसरीकडे अंधेरी स्टेशनजवळी विलेपार्ले एंडच्या बाजूने पुलाचा फुटपाथ कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली. अद्यापही पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत झालेली नाही.
संबंधित बातम्या
संधीसाधू टॅक्सीचालकांची मुजोरी, पावसात अडकलेल्या प्रवाशांची लूट
अंधेरीत ब्रिजचा फूटपाथ कोसळला, पाच जण जखमी
अंधेरी पूल दुर्घटना : आतापर्यंत काय-काय घडलं?
अंधेरी पूल दुर्घटना : मोटरमनचा इमर्जन्सी ब्रेक, अनेक प्रवाशांचे प्राण वाचले