मुंबई : ॲप आधारीत वाहतुकीबाबत गेल्या काही महिन्यांपासून प्रवासी आणि चालकांच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. ॲपवर आधारित वाहतुकीसाठी सरकार प्रशासनाकडून समितीने नेमून नियमावलीचे (Taxi cab App Regulations) काम सध्या सुरू आहे. त्यातच आता काही संघटनांनी ॲपवर आधारित वाहतूकदारांच्या काही मागण्यांसाठी ऐन सणासुदीच्या काळात बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अॅपवर आधारित वाहतूक नियमावली कधी होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.


राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्थानिक रिक्षा चालक आणि अ‍ॅप आधारीत टॅक्सी, बाईक सेवा पुरवणारी कंपन्या यांच्यात वाद सुरू आहे. मुंबई, ठाण्यातही ओला, उबेर या कंपन्या आणि टॅक्सी, रिक्षा चालक यांच्यात अधून मधून वाद होत आहेत. तसेच त्यामुळे ॲपवर आधारित चालक-मालक संघटना आणि प्रवासी देखील संतप्त आहेत.


महाराष्ट्र टॅक्सी, रिक्षा, कॅब चालक, डिलिव्हरी संयुक्त समितीच्या मागण्या


1. ई - चलान आणि परिवहन खात्याची ( आर.टी.ओ. आणि वाहतूक पोलीस ) दादागिरी बंद करा. दंडाच्या रकमा पूर्ववत करा. नवीन दंड माफ करा. कोरोना काळात वाया गेलेल्या दोन वर्षामुळे परिमट आणि अन्य परवानग्या दोन वर्षांनी वाढवा .


2 . विद्यमान महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे टॅक्सी, रिक्षा चालकासाठी कल्याण महामंडळ तावडीने कार्यान्वीत करा .


3 . केंद्र सरकाच्या अॅग्रीगेटर गाईडलाईन 2020 च्या आधारे गहाराष्ट्रातील सर्व गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी अॅग्रीगेटर गाईड लाईन तातडीने लागू करून कंपन्यांच्या लुटीला आळा घाला .


4 . अॅप वरील सर्व कॅब कंपन्यांचे चालक , खाद्य आणि अन्न पदार्थ डिलिव्हरी करणारे कामगार , अॅप आधारीत काम करणारे कामगार व अन्य कामगारांसाठी केंद्रीय वेल्फेअर कोड- 2020 नुसार राज्य शासनातर्फे कल्याण महामंडळ तातडीने कार्यान्वयीत करा .


5 . मुंबई विमानतळवरील टर्मिनल 1 आणि 2 वर प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी टॅक्सी चालकांना देण्यात येणाऱ्या व्हावचरच्या दरात तातडीने दरवाढ करा .


6. मुंबई विमानतळावरीलब टर्मिनल 2 वर प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी टॅक्सीसाठी कोरोना पूर्वीची पार्कंग जागा आणि प्रिपेड काऊंटर पूर्ववत करा आणि प्रिपेड काऊंटर संघटनांच्या ताब्यात द्या .


7. मुंबई विमानतळावरील टर्मिनल 1 आणि 2 वर ऑटो रिक्षाकरीत प्रिपेड काऊंटर सुरु करा.


8. कॅब अॅग्रिगेटर गाईडलाईनच्या धर्तीवर डिलिव्हरी सेक्टरसाठी आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांसाठी नियमावली तयार करून लागू करा. 


ॲपवर आधारित वाहतुकीवरून होणाऱ्या वादामुळे आणि त्यांच्या समस्येचा निराकरण करण्यासाठी एक नियमावली असावी म्हणून राज्य सरकारने याची दखल घेत 17 मे रोजी अॅपवर आधारित वाहतुकीसाठी नियमावली तयार करण्यासाठी एक समिती तयार केली आहे. त्यानुसार सध्या सर्वांशी चर्चा करून नियमावली करण्याचं काम वाहतूक विभाग आणि ही समिती करत आहे. मात्र यात आमच्या देखील मागण्यांचा वाहतूकदारांच्या दृष्टीने विचार करावा अशी मागणी महाराष्ट्र टॅक्सी /रिक्षा /डिलेव्हरी संयुक्त कृती समिती वाहतूक संघटनेच्या वतीने करण्यात आली. 


एकीकडे ही मागणी होत असताना दुसरीकडे प्रवासी आणि ॲप आधारीत वाहतूक चालकांच्या हितासाठी काही राजकीय पक्षाच्या वाहतूक संघटना, राष्ट्रीय कामगार संघ वाहतूक संघ, अॅपवर आधारित एकूण 16 पेक्षा अधिक कामगार संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र चालक मालक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांनी 19 ऑक्टोंबर ला होणाऱ्या संपाला विरोध करत नियमावली तयार करताना ती वाहतूकदाराच्या आणि प्रवाशांच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावी अशी मागणी केली.


सध्या अॅप बेस खाजगी वाहन, काळी - पिवळी टॅक्सी, बाईक आणि रिक्षा चालक - मालक यांना अनेक समस्या आहेत. त्या समस्यांसाठी महाराष्ट्र अॅप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनच्या नेतृत्वात 17 संघटना एकत्रित येत संपावर जात आहेत. त्यात दुसरीकडे महाराष्ट्र चालक-मालक संघटना कृती समिती यांच्या नेतृत्वात 18 संघटना या संपाला विरोध करत आहेत. या संघटनांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना मूळ प्रश्न हा आहे की ॲप वर आधारित आणि सरकार प्रशासन याची दखल घेत कार्यवाही लवकर करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


ही बातमी वाचा: