नवी मुंबई मुंबई आणि मुंबई जवळपासच्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)  मोस्ट वॉन्टेड आरोपीच्या पनवेल पोलिसांनी (Panvel Police) मुसक्या आवळल्या आहे. या आरोपीवर तब्बल 33 गुन्ह्यांची नोंद होती. हा आरोपी ओला-उबेर कॅब  (Ola Uber Cab) चालवत होता. पनवेल पोलिसांच्या या कारवाईनंतर पुन्हा एकदा परप्रांतातील गुन्हेगारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 


दुहेरी हत्या, खुनाचा प्रयत्न करणारे 7 गुन्हे, दरोडा, हाफ मर्डर, मारहाण, लुटमार अशा 33 गंभीर गुन्ह्यांत हा आरोपी फरार होता. उत्तर प्रदेशातील आझमगडमधील आरोपीला पनवेल पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. अब्दुक अजिज हा उत्तर प्रदेशातून फरार होता. उत्तर प्रदेशातून पोलीसांनी त्याच्यावर 50 हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. मोक्कासारखे तीन उत्तर प्रदेश गॅगस्टर अॅक्ट अंतर्गत गुन्हे आरोपी अब्दूल अजिजवर उत्तर प्रदेशमध्ये दाखल आहेत. 


पनवेल शहर पोलीस आणि युपी एसटीएफ टीमने संयुक्तरित्या कारवाई करत या आरोपीला अटक केली आहे. आपल्या काका बरोबर तो पनवेलमध्ये राहत होता. विशेष म्हणजे मोस्ट वॅाटेंड आरोपी असूनही तो ओला-उबेर सारख्या कंपन्यांमध्ये कॅब चालक म्हणून काम करीत होता. आपल्या भावाच्या लायसन्सवर हा आरोपी गाडी चालवत होता.  कंपनीकडे रोज सेल्फी फोटो पाठवूनही कंपनीकडून योग्यरित्या पडताळणी केली जात नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच वाँटेड आरोपी या अॅप बेस्ड कंपनीमध्ये चालक म्हणून काम करत होता, असे म्हटले जात आहे. पनवेल पोलिसांमुळे उघड झालेल्या या प्रकारामुळे या अॅप बेस्ड गाड्यांमधून प्रवास करणे धोकादायक असल्याचे दिसून येत आहे.


पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्यानंतरही 3 ठिकाणी केली चोरी, सराईत बॅग चोराला अखेर बेड्या


पोलिसांच्या तावडीतून पळालेला कुख्यात चोर मंगेश पार्टे याला अखेर आठ दिवसांनी पकडण्यात विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा 3 च्या पथकाला (Virar Police) यश आले आहे. विशेष म्हणजे फरार असतानाही या आरोपीने 3 ठिकाणी चोरी केली होती. त्याला यापूर्वी सख्या भावाच्या हत्या प्रकरणातही अटक करण्यात आली होती.


मंगेश उर्फ मनिष यशवंत पार्टे (48) हा सराईत चोर आहे. ट्रेनमध्ये, मंदिरातून तसेच बाजारातून तो लोकांच्या बॅंग चोरण्यात माहीर (Virar Bag Thief) आहे. 3 ऑक्टोबर रोजी त्याला विरार पोलिसांनी (Virar Police) अंबेमाता मंदिरात बॅग चोरी करण्याच्या प्रकरणात अटक केली होती. 5 ऑक्टोबर रोजी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी वसई विरार महापालिकेच्या चंदनसार येथील जीवदानी रुग्णालयात तपासणीसाठी आणले असताना बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांच्या हातातवर तुरी देऊन तो फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेते होते. अखेर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे माग काढत 14 ऑक्टोबर रोजी अटक केली.