Andheri Railway Station: CSMT नंतर अंधेरी रेल्वे स्थानकाचाही पुनर्विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. रेल्वे स्थानक आणि परिसरातील मोकळ्या जागेचा निवासी आणि व्यावसायिक वापर करण्याचा मार्ग खुला करण्यात आला आहे. अंतिम प्रस्तावावर रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रतीक्षा करण्यात आली आहे.


सीएसएमटीनंतर अंधेरी रेल्वे स्थानक पुनर्विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. रेल्वे स्थानक आणि परिसरातील मोकळ्या जागेचा निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी वापर करण्याचा मार्ग झाला खुला करण्यात आला आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरण (RLDA) आणि पश्चिम रेल्वेनं अंधेरी स्थानक पुनर्विकास आराखडा तयार केला आहे. मात्र अंतिम प्रस्तावावर रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. रेल्वे बोर्डानं मंजुरी दिल्यानंतर विकास कामांना सुरुवात होईल. प्रवासी वर्दळ सुलभपणे हाताळणं, जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवणं आणि शहरातील केंद्रबिंदू म्हणून सुविधा उपलब्ध करणं या बाबींवर फोकस करून पुनर्विकास होणार आहे.  


अंधेरी स्टेशन पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळ असणारं ठिकाण आहे. अंधेरी स्थानकावर हार्बर लाईन देखील जोडली जाते, तसेच मेट्रो वन मार्गे केबल अंधेरी स्थानक देखील या रेल्वे मार्गाला जोडलं गेलं असल्यानं दररोज पाच लाखांपर्यंत प्रवाशांची वाहतूक रेल्वे स्थानकातून होत असते. 



पुनर्विकास आराखड्यातंर्गत मुक्त वावर क्षेत्र आणि तिकीट बंधनकारक असलेले क्षेत्र असे दोन भाग विकसित करण्याचे नियोजन आहे. स्थानक परिसरातील जागेत निवासी संकूल देखील उभारण्याचे प्रस्तावित आहे. हरित इमारतीवर दिव्यांग पूरक स्थानक, सीसीटीव्ही आणि आधुनिक इमारत व्यवस्थापन आणि स्मार्ट स्थानक, सीएसएमटीच्या धर्तीवर प्रवासी सुविधा देण्याची प्रस्तावित आहे. दरम्यान, पुनर्विकासाचा आराखड्याला प्राथमिक मंजूरी मिळाली असून रेल्वे मंडळाची मंजूरी प्रक्रिया सुरू आहे. 


अंधेरी रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार 


मुंबईच्या पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्वाधीक गर्दीचे स्टेशन ओळखल्या जाणाऱ्या अंधेरी रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आयआरएसडीसी अंधेरी रेल्वे स्टेशनचा टप्प्याटप्प्यानं विकसित करेल. यासाठी पुनर्विकासाचे एकूण क्षेत्र 4.31 एकर आहे. पहिल्या टप्प्यात 2.1 एकर आणि दुसर्‍या टप्प्यातील उर्वरित क्षेत्रावर काम केलं जाणार आहे.


CSMT स्थानकाचाही पुनर्विकास 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही पुनर्विकास होणार आहे. सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी 1800 कोटी मिळणार आहेत. सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासासाठी गेल्या अनेक दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. पुनर्विकासामध्ये आता सीएसएमटीच्या सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, पुनर्विकासानंतर स्थानकामध्ये खाण्यापिण्याची दुकाने आणि मनोरंजनाच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. तसेच स्थानकात ऊर्जा बचत करणाऱ्या यंत्रणेचा वापर जास्त केला जाईल. यादरम्यान दिव्यांगांना विविध सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.