राज्यात आतापर्यंत 30 हजार कोरोना बाधित रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी परतले असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्याचा मृत्यू दर 3 टक्के आहे. देशात सर्वाधिक कोरोना चाचणी आपल्या राज्यात करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचं बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यांची तुलना केली तर, मार्च महिन्यात 302 पैकी 39 असे 12.91 टक्के रुग्ण बरे झाले होते. एप्रिल महिन्यात 10,498 पैकी 1773 असे 16.88 टक्के रुग्ण बरे झाले. मे महिन्यात 67,655 पैकी 29,329 असे एकूण 43.35 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर, राज्यातील मृत्यूदर 3.37 टक्के आहे.
Coronavirus Update | राज्यात 2361 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 779 रुग्ण कोरोनामुक्त
खासगी रुग्णालयाने ठरलेले दर आकारावे
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने खासगी रुग्णालयासाठी दर निर्धारित केले आहेत. त्याप्रमाणेच दर खासगी रुग्णालयांनी आकारावे, अशा सूचना राजेश टोपे यांनी केल्या आहेत. या नियमांचे उल्लघन करणाऱ्या रुग्णालयाविरोधात कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी आमचं एक पथक खासगी रुग्णालयांना भेट देणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. कंटेनमेंट झानमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहून सर्व बंद असणार आहे.
राज्यात 2361 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात आज कोरोनाच्या 2361 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 70013 वर गेली आहे. यापैकी सध्या राज्यात 37 हजार 234 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात 76 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2362 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 779 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत 30108 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Corona Ground Report कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट