मुंबई: नव्या 50 आणि दोनशेच्या नोटेनंतर आता दहा रुपयाची नवी नोट बाजारात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच दहाची नवी नोट जारी करणार आहे.

महात्मा गांधी सीरिजमधील नवी नोट तपकिरी रंगाची असेल. आरबीआयने 10 रुपयांच्या कोट्यवधी नोटांची छपाई सुरुही केली आहे. 

गेल्याच आठवड्यात या नोटेचं डिझाईन निश्चित झालं होतं. त्यानंतर आता तिची छपाईही सुरु झाली आहे. यापूर्वी 2005 मध्ये दहाच्या नोटेत बदल करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास 13 वर्षांनी पुन्हा या नोटेची रचना बदलण्यात येत आहे.

आरबीआयने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात महात्मा गांधी सीरिजमधील 200 आणि 50 रुपयांची नोट जारी केली होती. त्यानंतर आता नवी दहाची नोट येणार आहे. 

नव्या दहा रुपयाच्या नोटेची वैशिष्ट्ये

  • नवी दहाची नोट तपकिरी रंगाची असेल

  • या नोटेवर कोणार्क सूर्य मंदिराचं चित्र असेल.


दोनशेची नोट एटीएममधून मिळणार

नोटाबंदीनंतर दोन हजाराच्या नोटेसाठी केलेल्या रिकॅलिब्रेशननंतर, आता पुन्हा एकदा बँकांना आपली एटीएम रिकॅलिब्रेट अर्थात करावी लागणार आहेत. दोनशेची नोट एटीएममधून वितरित व्हावी, यासाठी एटीएम रिकॅलिब्रेट करावी लागणार आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने तसे आदेश बँकांना दिले आहेत.

पण या रिकॅलिब्रेशनसाठी बँकांना थोडाथोडका नव्हे तर तब्बल 1 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. नोटाबंदी, थकीत कर्ज या आणि अन्य कारणांमुळे बँका आधीच अडचणीत असल्याचं सांगत आहेत. त्यात एटीएम रिकॅलिब्रेट करण्याचा खर्च बँकांना करावा लागणार आहे.

संबंधित बातम्या

दोनशेच्या नोटेसाठी ATM रिकॅलिब्रेशनचे आदेश, बँकांना खर्च....