वायकरांचा निरुपम यांच्यावर 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2016 01:02 PM (IST)
मुंबई : गृहनिर्माण राज्यमंत्री आणि शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनी मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर 10 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. भ्रष्टाचाराचे आणि जमीन हडपल्याचे आरोप करणाऱ्या निरुपम यांनी जर 15 दिवसात जाहीर माफी मागितली नाही तर कारवाईला तयार राहावं असा इशाराही वायकरांनी दिलाय. आपण शस्त्रक्रियेसाठी परदेशी गेलो असता बिनबुडाचे आरोप करुन संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं, ज्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आणि मानसिक त्रासही झाला, असं वायकरांनी म्हटलंय. गृहनिर्माण राज्यमंत्री असलेल्या वायकरांविरोधातील पुरावे घेऊन निरुपम मुख्यमंत्र्यांनाही भेटले होते. तसंच वायकरांच्या राजीनाम्याची मागणीही केली निरुपम यांनी केली होती.