उसने पैसे परत न दिल्यानं महिलेवर बलात्कार, आरोपी अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2016 06:25 PM (IST)
डोंबिवली: उसने घेतलेले पैसे परत दिले नाही म्हणून डोंबिवलीच्या कोळेगावात महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अँथोनी जोसेफ असं आरोपीचं नाव असून त्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेनं आपल्या आईसाठी आरोपीकडून उसने पैसे घेतले होते. मात्र, त्याच्या बदल्यात अँथोनीनं शरीर सुखाची मागणी केली. त्यानंतर एक दिवस घरामध्ये कोणी नसताना पीडित महिलेवर जबरदस्ती केली. या सगळ्या प्रकारात पीडित महिलेच्या आईचाही हात असल्याचा संशय आहे. दरम्यान, पीडित महिलेनं मानपाडा पोलिसांकडे आई आणि आरोपीविरोधात तक्रार केली असून मानपाडा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.