महाडचा 'देवदूत' बसंत कुमारचा राज ठाकरेंकडून सत्कार
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2016 03:41 PM (IST)
मुंबई : महाड दुर्घटनेत देवदूत ठरलेल्या बसंत कुमारवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर सत्कार केला. बसंत कुमारच्या समयसुचकतेमुळे अनेकांचे जीव वाचले. ज्या ठिकाणी पूल कोसळून दुर्घटना घडली, त्या पुलाच्या अलिकडे बसंत कुमारचं गॅरेज आहे. त्यामुळे पूल कोसळला त्यावेळी मोठा आवाज ऐकल्यानंतर बसंत कुमारने घटनास्थळाकडे धाव घेतली काळ्यामिट्ट अंधारात धावून आला. गॅरेजमधूनच त्यानं दोन बसेस पुलासकट नदीत वाहून गेल्याचं पाहिलं. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. पण त्यातूनही स्वत:ला सावरत तो रस्त्यावर आला.