कल्याण : आपल्या अनोख्या शैलीतील वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे रिपाइं नेते रामदास आठवले यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना एक सल्ला दिला आहे. राहुल गांधींनी आता पप्पा होण्याची गरज असल्याचं आठवले म्हणाले.
रामदास आठवलेंनी राहुल गांधींना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. राहुल गांधी हे आता पप्पू राहिलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी आता पप्पा होण्याची गरज आहे, असं आठवले आपल्या खास शैलीत म्हणाले. कल्याणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.
दुसरीकडे, कोस्टल रोडवरुन आपापसात भिडलेल्या शिवसेना आणि भाजपलाही त्यांनी चिमटे काढले. कोस्टल रोडचं भूमिपूजन कुणीही केलं असलं, तरी हा प्रकल्प लोकांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी समजूतदारपणे वागण्याचा सल्ला आठवलेंनी दिला.
शिवसेना-भाजप या दोघांचं मनोमिलन आपण करणार का? असा प्रश्न आठवलेंना विचारण्यात आला, तेव्हा 'या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल जलन आहे, पण तरी मनोमिलन होणं गरजेचं आहे' असंही आठवले म्हणाले.
राहुल गांधींनी पप्पा होण्याची गरज : रामदास आठवले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Dec 2018 10:28 PM (IST)
रामदास आठवलेंनी राहुल गांधींना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. राहुल गांधी हे आता पप्पू राहिलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी आता पप्पा होण्याची गरज आहे, असं आठवले आपल्या खास शैलीत म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -