पुढील निवडणुका बॅलेट पेपरनं घेतल्या तरी चालेल : रामदास आठवले
एबीपी माझा वेब टीम | 24 Jan 2019 01:54 PM (IST)
देशात पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत संभ्रम निर्माण झालेला असतानाच आज निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा निवडणुका ईव्हीएमनंच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर रामदास आठवले यांनी मात्र निवडणुका बॅलेट पेपरनं घेतल्या, तरी आमचा पाठींबाच असल्याचं म्हटलं आहे.
कल्याण : देशात ईव्हीएम मशीनबाबत संभ्रमाचं वातावरण असताना पुढील निवडणुका बॅलेट पेपरनं घेतल्या, तरी आमचा पाठिंबाच असेल, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. कल्याणमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आठवले बोलत होते. काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये एका हॅकरनं पत्रकार परिषद घेत ईव्हीएम मशीन हॅक झाल्याचा दावा केला होता. त्यामुळं देशात पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत संभ्रम निर्माण झालेला असतानाच आज निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा निवडणुका ईव्हीएमनंच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर रामदास आठवले यांनी मात्र निवडणुका बॅलेट पेपरनं घेतल्या, तरी आमचा पाठींबाच असल्याचं म्हटलं आहे.