मुंबई: सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात आली. त्यानंतर बडोलेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. मी कोणत्याही जातीबद्दल नाही तर केवळ मोर्चांबाबत बोललो. असं स्पष्टीकरण बडोले यांनी दिलं आहे.

कोणत्या समाजावर, एखाद्या मोर्चाबद्दल मी बोललो नाही. तर देशातील एकूण परिस्थितीबाबत बोललो आहे. पैसेवाले कोण आहेत ते मला माहित नाही. पैसेवाल्यांचा विषय नाही.'' असंही बडोले म्हणाले,

'पैसेवाल्यांची आंदोलने यशस्वी होत आहेत'


'सध्या पैसेवाल्यांची आंदोलनं मोठी होत आहेत. कुणीही उठसूठ आरक्षणाची मागणी करतं आहे.' असं विधान राजकुमार बडोले यांनी केलं होतं.

'शिवाय कोपर्डीच्या नावाखाली जर कुणी अनुसुचित जातींवर अन्याय केला तर तो आम्ही सहन करणार नाही, प्रसंगी राजीनामा देईन.' असंही बडोले म्हणाले होते. काल औरंगाबादेत आयोजित इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवलमध्ये ते बोलत होते.

VIDEO: