मराठा मोर्चाच्या राजन घाग यांना भाजपचं तिकीट
एबीपी माझा वेब टीम | 03 Feb 2017 03:52 PM (IST)
मुंबई: मराठा समाजाचा रोष पत्करणाऱ्या भाजपने मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई समन्वयाकालच तिकीट दिलं आहे. भाजपने राजन घाग यांना उमेदवारी दिली आहे. राजन घाग हे वॉर्ड क्रमांक 205 (शिवडी) मधून लढणार आहेत. राजन घाग यांनी मराठा क्रांती मोर्चाची मुंबईमधील बाईक रॅली आयोजिक केली होती. याशिवाय अनेक बैठकांचे आयोजनही घाग यांनीचं केलं होतं. त्यामुळे भाजपने मराठा क्रांती मोर्चातील आयोजकलाच आपल्या ताफ्यात घेतलं आहे.