ठाण्यात भाजप कार्यालयात तिकिटावरुन हाणामारी, 1 जण जखमी
एबीपी माझा वेब टीम | 03 Feb 2017 01:18 PM (IST)
ठाणे: ठाण्यात काल रात्री तिकीट वाटपावरुन झालेली धक्काबुक्की ताजी असताना ठाण्याच्या भाजप कार्यालयात आज पुन्हा एकदा हाणामारी झाली आहे. या हाणामारीमध्ये एकजण जखमी झाला असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, काल रात्री राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचं बोललं जात आहे. ठाण्यातील खोपट येथील भाजप कार्यलयात इच्छुक उमेदवारांनी तिकीट वाटपावरुन गोंधळ केला. पैसे घेऊन उमेदवारी वाटल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. रात्री 12 च्या सुमारास अर्वाच्य भाषा वापरुन कार्यकर्त्यानी आपला संताप व्यक्त केला होता. मुलाखती झाल्या नाहीत. कामं करुनही आम्हाला तिकीटं दिलं नाही. पैसे देऊन तिकीटं वाटली. असा आरोप इच्छुक उमेदवारांनी यावेळी केला. संबंधित बातम्या: