मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. ईव्हीएमवर बंदी घालण्याचं आवाहन राज ठाकरेंनी या पत्रातून केलं आहे.
राज ठाकरे ईव्हीएम विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. एव्हीएमवर बंदी घालण्यासाठी राज ठाकरेंनी पुन्हा एक पाऊल पुढे टाकलं. भाजप वगळता सर्व पक्षाच्या प्रमुखांना राज ठाकरेंनी पत्र दिलं.
'ईव्हीएमवर बंदी आणुया, अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार घालूया' असं आवाहन राज ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून केलं आहे. या पत्राला उद्धव ठाकरे काय उत्तर देतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी राज ठाकरे यांनी उद्धव यांच्याकडे युतीचा प्रस्ताव पाठवला होता, मात्र शिवसेनेकडून कोणतंही उत्तर आलं नव्हतं.