मुंबई: ‘राष्ट्रपती फक्त रबर स्टॅम्प आहे, त्यांचा देशाला कधीच फायदा झालेला नाही.’ असं वादग्रस्त वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. राष्ट्रपती निवडीविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी हे वक्तव्य केलं.

‘देशातले नागरिक राष्ट्रपतींना पत्र लिहतात, मात्र त्याचं कधीच उत्तर कधीच मिळत नाही.’, मग राष्ट्रपती गोविंद झाले किंवा गोपाळ झाले त्याचा आम्हाला काय उपयोग?’ असंही राज ठाकरे म्हणाले.

राष्ट्रपती पदाबाबत नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

‘राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प’

‘आतापर्यंत फक्त याकूब मेमनच्या फाशीच्या वेळी राष्ट्रपतींचा उपयोग झाला. आज इतके विषय या देशात आहेत. सरकारकडून जी दडपशाही चालू आहे त्याबाबत राष्ट्रपतींना मोठ्या प्रमाणात देशभरातून नागरिक पत्र, मेल पाठवतात. त्यांना कुठंची उत्तरं मिळतात का? आणि पूर्वीपासून राष्ट्रपती पदासाठी जो शब्द वापरला जातो. तो म्हणजे रबर स्टॅम्प. ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प. म्हणजे राष्ट्रपती.’ असं राज ठाकरे म्हणाले.

‘राष्ट्रपतींचा उपयोग शून्य’

‘त्या व्यक्तीचा या देशातील नागरिकांना काही उपयोग आहे का? एवढाच माझा फक्त विषय आहे. तर तो काही नाही, तो शून्य आहे. आठवून बघा किती राष्ट्रपती झाले आणि त्यांच्यामुळे काय झालं? काहीही झालेलं नाही. आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल किंवा इतर कोणतेही आंदोलन नाही. त्यांचा काही उपयोग नाही. इतकी आंदोलनं झाली. त्यात राष्ट्रपतींनी काय केलं? ते असल्या विषयांमध्ये येत नाहीत. मग आम्हाला काय फरक पडतो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

VIDEO