मुंबई : "टोलनाक्यांवर पारदर्शकता (Mumbai Toll Naka) यावी यासाठी सरकारचे कॅमेरे लावले जातीलच, पण मनसेही कॅमेरे लावून वॉच ठेवेल. इतकंच नाही तर टोलनाक्यांवर 4 मिनिटांपेक्षा जास्त एकही गाडी थांबणार नाही", असा निर्णय झाल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Toll)यांनी दिली.  राज ठाकरे यांच्या घरी आज मुंबई आणि महाराष्ट्रातील टोलच्या (Maharashtra Toll) मुद्द्यावर बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुरुवारी 12 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीनंतर, आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावर (Shivteerth) बैठकीचं नियोजन होतं. त्याप्रमाणे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासह प्रशासकीय अधिकारी सकाळी सकाळी 8 वाजता राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले. यानंतर राज ठाकरेंसोबत टोलबाबत चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली. 


राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?  (Raj Thackeray PC)


काल सह्याद्रीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाली. त्यात काही गोष्टी ठरल्या. लेखी स्वरूपात काही गोष्टी काल आल्या नाहीत. नंतर मग आजही बैठक झाली ज्यामध्ये लेखी स्वरूपात काही गोष्टी आल्या आहेत.


9 वर्षानंतर मी सह्याद्री वर गेलो. त्याचवेळी कळलं होतं की टोल संदर्भातील अॅग्रीमेंट 2026 पर्यंत संपणार होते हे मला माहित आहे. 


2026 पर्यत अॅग्रीमेंट बँकेसोबत झाल्याने त्यात आता काही करता येत नाही. ठाण्यातील 5 एन्ट्री पॉईंट्सवर टोल वाढविण्यात आले. त्याबाबत मनसेच्या अविनाश जाधव यांनी आंदोलन केले. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वक्तव्य केले की चारचाकी आणि तीन चाकी वाहनांना टोल नाही असे ते म्हणाले. लोकांना वाटलं की आम्हला फसवलं जातंय की काय? 


मनसेच्या कॅमेऱ्यांचा टोलवर वॉच (MNS camera on Toll)


टोल घेणार असाल तर तुम्ही कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. पुढचे 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि आमच्या पक्षाचे कॅमेरे लावले जातील. आणि किती गाड्या या टोलवरून जातात हे कळेल. ही व्हिडिओग्राफी उद्या पासून सुरू होईल.  अॅम्ब्युलन्स,स्वच्छतागृह, सीसीटीव्हीचे कंट्रोल मंत्रालयात असेल तिथे लोकांना काय त्रास होतोय लोकांना ते कळेल. 


करारमधील नमूद उड्डाणपूल यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. आयआयटी मुंबईकडून हे ऑडिट करण्यात येईल. 5 रुपये वाढीव टोलबाबत 1 महिन्याचा अवधी सरकारला हवा आहे. त्यानंतर वाढीव टोल रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल. 


यलो लाईनच्या पुढे वाहनांच्या रांगा गेल्या तर वाहनांचा टोल न घेता टोलवरून वाहने सोडली जातील. किती टोल आहे, किती भरले गेले, जमा किती झाले हे सगळं लोकांसमोर येईल यासाठी दोन्ही बाजूने बोर्ड लावले जातील. 


आनंदनगरवरुन ऐरोली टोलनाक्यावर एकच टोल (Anand Nagar to Airoli Toll)


आनंद नगर टोलनाक्यावरून ऐरोली टोल नाक्यावर जायचे असेल तर एकच टोल भरावा लागेल. याचा निर्णय 1 महिन्यात घेतला जाईल. 


हरी ओम नगर मुलुंडमधील रहिवाशांना ब्रिज बांधून देण्यात येईल त्यांना टोल भरण्याची गरज नसेल. 


राष्ट्रीय महामार्गावर जर रस्ते खराब असतील तर त्या ठिकाणचा टोल रद्द करण्याबाबत राज्य सरकार केंद्र सरकारशी 15 दिवसात बोलेल.


सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 आणि एमएसअरडीसीचे 14 असे टोलबाबत महिन्यात निर्णय घेतला जाईल हे टोल बंद करावे अशी आमचे मागणी आहे. 


अवजड वाहनांना शिस्त लावण्यासाठी एक लेन असावी यासाठी दादा भुसे विचार करतील. 


प्रत्येकाला वाटंत की आम्हला रस्ते चांगले मिळावे 


मी नितीन गडकरी यांच्याशी सुद्धा बोलणार 


रस्ते सुधारण्याची जबाबदारी ही टोलवाल्यांची आहे


राज्य सरकार अखत्यारीत असलेल्या टोलबाबत निर्णय राज्य सरकार करेल


दादा भुसे काय म्हणाले?  (Dada Bhuse meet Raj Tahckeray)


मुंबई एन्ट्री पॉईंट्स टोल आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर समिती वेगळी नेमण्यात आली आहे.  राज ठाकरे यांनी जे मुद्दे ठेवले त्यावर आम्ही आजच कामाला लागलो.एन्ट्री पॉईंट्स आणि राज्यातील टोल बाबत सविस्तर चर्चा झाली. आम्ही काय सुविधा दिल्या त्याची माहिती दिली. टप्याटप्याने आम्हाला अंमलबजावणी करायची आहे, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. 


 टोलवसूल करणाऱ्यांचं बॅकग्राऊंड तपासा (Maharashtra Toll)


ज्या टोल नाक्यावर वसुलीसाठी जे कर्मचारी बसवले जातात, त्यांचं बॅकग्राऊंड तपासणे गरजेचं आहे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. त्यावर आपण तसे आदेश दिल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. 


शासन आपल्या दारी (Shashan Aaplya Dari)


टोल नाक्यावर स्वच्छतागृह उभारली पाहिजेत. आम्ही सुद्धा कंटेंनर एन्ट्री पॉईंट्सला ठेवतो. बातम्यांसाठी मी विषय घेत नाही. आज मंत्री घरी आले कारण मी भुसेंना आता ओळखत नाही ते काम करतात. 1 महिन्यात काम करतील अशी अपेक्षा ठेवूया. ते माझ्या घरी आले म्हणताय कारण शासन आपल्या दारी असलेले हे सरकार आहे, असं टोमणा राज ठाकरे यांनी लगावला. 


Watch Raj Thackeray full PC on Toll : राज ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद



 


संबंधित बातम्या