Mumbai University News: परिक्षेत (Exams) उत्तीर्ण करण्यासाठी दहा हजार रुपये मागितल्याचा (Brieb) आरोप मुंबई विद्यापीठात (Mumbai University) शिकणाऱ्या एका विद्यापिठानं केला आहे. आयडॉलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं कुलगुरूंकडे तक्रार केली आहे. नापास झालेल्या विषयांमध्ये उत्तीर्ण करण्यासाठी दहा हजार रुपये मागितल्याचा आरोप संबंधित विद्यार्थानं केला आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात युवासेनेनं आणि विद्यार्थ्यानं संबंधित व्यक्तीचा फोटो आणि या सगळ्या संबंधीची तक्रार मुंबई विद्यापीठाची कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.
परीक्षेमध्ये पास करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक आरोप मुंबई विद्यापीठात शिकत असलेल्या विद्यार्थ्यानं केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला नापास झालेल्या विषयांमध्ये पास करण्यासाठी दहा हजार मागितल्याचा आरोप संबंधित विद्यार्थ्यानं केला आहे. संबंधित विद्यार्थी पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. चौथ्या सत्रात त्याला तीन विषयांत एटी-केटी लागली होती. त्यामुळे या विषयात उत्तीर्ण व्हायचं असल्यास आयडॉलमधील अधिकाऱ्यानं दहा हजार रुपये मागितले, असं संबंधित विद्यार्थ्यानं सांगितलं आहे. एका पाकिटात दहा हजार भर आणि त्यासोबतच हॉल तिकीट आणि तुझा मोबाईल नंबर लिहून दे, असं संबंधित व्यक्तीनं त्या विद्यार्थ्याला सांगितल्याचा आरोपही विद्यार्थ्यानं केला आहे.
विद्यार्थ्यानं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, चौथ्या सत्रात मला तीन विषयांत एटी-केटी लागली. त्यामुळे रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करण्यासाठी गेलो. अर्ज करताना त्यांनी मला सांगितलं की, रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय केलंस तरी तू काही पास होणार नाही, जर तुला पास व्हायचं असेल, तर त्यासाठी तुला दहा हजार रूपये द्यावे लागतील, असं त्यांनी मला सांगितलं. आधी त्यांनी 15 हजार सांगितले, त्यानंतर त्यांनी 10 हजार सांगितले. त्यावर मी त्यांना सांगितलं की, एवढे पैसे माझ्याकडे नाहीत आणि जर मी पेपर लिहिलाय, तर मग त्यात मला नापास का करणार? त्यावर ते म्हणाले तू काहीही कर तू पास काही होणार नाही. जर तुला पास व्हायचं असेल तर एका पाकिटात पैसे भरुन त्यावर तुझा नंबर लिही."
पाहा व्हिडीओ : Mumbai Univercity : मुंबई विद्यापीठात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला मागितले 10 हजार : ABP Majha