मुंबई: संघटन करण्यासाठी पक्षाला वेळ लागतोच. वाईट काळात चुकाच दिसतात, चांगल्या काळात दिसत नाहीत.  पक्ष कसा चालवायचा हे मला सांगू नका, माझ्या पक्षाचं मी बघून घेईन, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'माझा कट्टा'वरील अनेक प्रश्नांना बगल दिली. मनसेची पडझड, आव्हानं आणि नाशिकमध्ये केलेल्या कामांबाबत राज ठाकरेंनी 'माझा कट्टा'वर गप्पा मारल्या.

"मी केलेली कामं ताजी आहेत, ती लोकांच्या विस्मरणात जाणार नाहीत.

  विजय पैशाचा होतोय की कामाचा हे मला पाहायचं आहे",

-राज ठाकरे 

माझ्या पक्षाचं मी बघून घेईन नाशिकमध्ये अनेक नगरसेवक, आमदार सोडून का गेले याबद्दल मला बोलायचं नाही, ते मी तुम्हाला का सांगू? असं म्हणत राज ठाकरेंनी उत्तर टाळलं.

 "माझ्या पक्षाचं मी बघून घेईन,

पक्ष कसा चालवायचा हे मला सांगू नका",

-राज म्हणाले.

..म्हणून शिवसेनेसमोर हात पुढे केला  मुंबई ही मराठी माणसाच्या हातात रहावी ही माझी इच्छा होती. छोटी राज्ये करण्याचा भाजपचा पूर्वीपासूनचा डाव आहे. त्यांचं मुंबई आणि विदर्भ तोडण्यावर प्रामुख्याने लक्ष आहे. भाजपचा हा डाव ओळखून,शिवसेनेसमोर युतीसाठी हात पुढे केला होता, मात्र तो विषय माझ्यासाठी तेव्हाच संपला, असं राज ठाकरे म्हणाले.

"भाजपचा मुंबई तोडण्याचा डाव ओळखून

शिवसेनेसमोर युतीसाठी हात पुढे केला होता.

मात्र तो विषय माझ्यासाठी तेव्हाच संपला"

- राज ठाकरे

पैशासाठी अनेकांनी मनसेला सोडलं मनसे सोडून अनेक गेले असं जाणीवपूर्वक सांगितलं गेलं. मात्र कालची गर्दी पाहून ताकद लक्षात आली असेल. जे जे सोडून गेले त्यांची कारणं अनेक असली, तरी अनेक जण पैशासाठीच सोडून गेले, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

"नाशिकमध्ये अनेक नगरसेवक मनसे सोडून गेले.

त्याची कारणं काहीही असली,

तरी पैसा हे त्यातील मुख्य कारण होतं" - राज ठाकरे 

माझं लक्ष मोठ्या शहरांवर राजकीय पक्षाला स्थिरावण्यासाठी अनेक वर्ष जावी लागतात. प्रत्येक पक्षात स्थित्यंतरं येतात. मी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. पक्षबांधणीचं काम चालूच आहे. सध्या माझा फोकस मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या शहरांवर आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

"पक्षबांधणीचं काम चालूच आहे.

सध्या माझा फोकस मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या शहरांवर आहे",

असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

नोटाबंदीत भाजपकडे पैसा कसा मोदींनी नोटाबंदी केली, मात्र सध्या भाजपच्या जाहिराती पाहाता, त्यांच्याइतका पैसा दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे नाही हे दिसतं. माझ्या घरापासून बाहेर पडल्यानंतर भाजपचे 62 होर्डिंग्ज दिसले. त्यामुळे भाजपकडे हा पैसा कुठून आला, असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला.

"नोटाबंदीचा फटका सर्वांनाच बसला, मात्र त्यातून भाजप कशी वाचली? 

भाजपच्या जाहिराती पाहाता, त्यांच्याइतका पैसा दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे नाही हे दिसतं.

भाजपकडे हा पैसा कुठून आला" - राज ठाकरे 

'ऐ दिल है मुश्किल' 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमा बघा किंवा बघू नका असं मी म्हटलं नव्हतंच. माझ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची वाक्यं, माझ्या तोंडी घालू नका. मात्र एवढा मोठा देश असताना पाकिस्तानी कलाकार का? आम्ही टोकाची भूमिका घेतल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही का, असं म्हणत राज ठाकरे यांनी  पाकिस्तानी कलाकारांबाबतचा विरोध कायम असल्याचं सांगितलं.

"एवढा मोठा देश असताना पाकिस्तानी कलाकार का?

आम्ही टोकाची भूमिका घेतल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही का" - राज ठाकरे 

  रतन टाटांची कौतुकाची थाप नाशिकमध्ये मी कामं केली आहेत. रतन टाटांनी ही कामं पाहिली आहेत. रतन टाटांनी माझ्या कामाचं कौतुक केलं, ती माझ्यासाठी शाबासकी आहे, असं राज ठाकरे म्हणाले. "वेल डन! राज", असं जेव्हा रतन टाटा म्हणाले, ती माझ्यासाठी शाबासकी होती. मी केलेल्या कामाचं रतन टाटांनी कौतुक केलं, त्यांच्या शुभेच्छा माझ्यासाठी मोठ्या आहेत. मात्र रतन टाटांकडून कामाला शुभेच्छा आहेत पक्षाच्या प्रचाराला नाहीत, असंही राज ठाकरेंनी सांगितलं. 'माझा कट्टा'वरील मुद्दे
  • मुंबई मराठी माणसाच्या हातात रहावी ही माझी इच्छा होती - राज ठाकरे
  • छोटी राज्य करण्याचा भाजपचा मानस, मुंबई आणि विदर्भवर प्रामुख्याने त्यांचं लक्ष
  • भाजपचा डाव ओळखून शिवसेनेकडे हात पुढे केला होता, मात्र तो विषय माझ्यासाठी तेव्हाच संपला -
  • अस्मितेच्या राजकारणावर फडणवीसांनी बोलू नये
  • राजकारण लहानपणापासून पाहतोय, शिवसेनेतून अनेकजण गेले, स्थित्यंतरं प्रत्येकाला असतात
  • ऐ दिल है मुश्किल बघा किंवा बघू नका असं म्हटलं नव्हतं -
  • टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय यांना समजत नाही, एवढा मोठा देश असताना पाकिस्तानी कलाकार का?
  • चित्रपट बंद करणं हा माझा धंदा नाही, यापुढे पाक कलाकार घेणार नाही असं सांगितलं, त्यामुळे परवानगी
  • कोणाशी वैयक्तिक वाद नसतो, पक्षाच्या भूमिकेला विरोध असतो
  • मी कोणाशी युती करण्यासाठी निवडणूक लढवत नाहीय
  • मी मोदींना 2 वर्षापूर्वी पाठिंबा दिला, पण जिथे पटत नाही तिथे विरोध केला, मग यूटर्न कसा?
  • राजकीय गुन्हे आणि गंभीर गुन्हे यात फरक, मनसेचे गुन्हेगार दाखवा
  • गुन्हेगारांना उमेदवारी देणं चुकीचंच, त्याला समर्थन नाही
  • भाजपचे 88 उमेदवार गुन्हेगार, हे उद्या महापालिका चालवणार का?
  • नाशिकमधले सोडून गेलेले नगरसेवक पैशासाठी गेले
  • नाशिकला 10 वर्ष मागे घेऊन जायचं की विकासाला साथ द्यायची हे जनतेने ठरवावं
  • माझा पक्ष कसा वाढवायचा हे मी बघेन
  • वाईट काळात चुकाच दिसतात, चांगल्या काळात दिसत नाहीत
  • संघटन करण्यासाठी पक्षाला वेळ लागतोच
  • घरापासून निघाल्यापासून इथपर्यंत पोहोचेपर्यंत भाजपचे 62 होर्डिंग्ज होते
  • नोटाबंदी झाली, मग भाजपकडे जाहिरातबाजीसाठी इतका पैसा कसा?
  • पक्ष कसा चालवायचा हे मला सांगू नका- राज ठाकरे
  • सध्या माझा फोकस मोठ्या शहरांवर
  • 49 वर्षानंतर काँग्रेसची आजची स्थिती काय?
  • आमदार सोडून का गेले याबद्दल मला बोलायचं नाही, ते मी का सांगू?
  • मी उभं करतोय ते प्रामाणिकपणे करतोय, यापेक्षा मी काय सांगू?
  • फेस व्हॅल्यू जर फेसबूकने येत असेल, तर फेसबूकवर यायला हवं
  • राजाला साथ द्या हे गाणं आणि शब्द अवधूत गुप्तेने लिहिलंय
  • मी एकटा पडलोय ही कार्यकर्त्यांची भावना
  • उमेदवारांची परीक्षा चांगल्या उद्देशाने सुरु केली होती
  • नाशिकमध्ये सर्वाधिक अनधिकृत बांधकामं पाडली
  • प्रयत्न सोडून द्यायचे नसतात
  • मी केलेल्या कामाचं रतन टाटांनी कौतुक केलं, त्यांच्या शुभेच्छा माझ्यासाठी मोठ्या
  • रतन टाटांकडून कामाला शुभेच्छा, पक्षाला नाही
  • माझ्यावरच्या केसेस या घरच्या कामासाठी नाहीत, मराठी माणसासाठी आहेत
  • नाशिकमधील रस्त्यांची क्वालिटी तपासून घेतली- राज ठाकरे
  • अतिक्रमण हटवण्यासाठी केवळ इच्छा लागते, इच्छा असल्यास सहज शक्य
  • वेल डन राज, असं जेव्हा रतन टाटा म्हणाले, ती माझ्यासाठी शाबासकी होती-