राज ठाकरे - मुख्यमंत्र्यांची भेट, मुद्दा 'नीट'चा, चर्चा राजकीय?
एबीपी माझा वेब टीम | 09 Jun 2016 06:10 AM (IST)
मुंबई: मेडिकल प्रवेशाच्या नीट परीक्षेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंसोबत पालकही होते. मुख्यमंत्री फडणवीस, राज ठाकरे आणि पालक यांच्यातील ही भेट 20 मिनिटे झाली. त्यानंतर मात्र फक्त राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात खासगीत बैठक झाली. ही बैठक राजकीय असल्याची चर्चा आहे. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात गुप्त चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे नीटच्या पडद्याआड राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीट तर झाली नाही ना? अशी चर्चा आहे.