मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदीवरील भोंग्याबाबतची भूमिका आणि मदरशांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. मनसे मधील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी आपल्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 


मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर इरफान शेख यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर  झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी आपली भूमिका कायम ठेवल्यामुळे इरफान यांनी मनसेच्या सचिव पद आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 
 
इरफान शेख यांना पक्षाने मागील विधानसभा निवडणुकीवेळी राज्य सचिव पदाची जबाबदारी सोपवली होती. शेख यांनी राज ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "पक्षाच्या आंदोलनात अनेक केसेस अंगावर घेतल्या. 2008 च्या मराठी पाट्या आंदोलनात पोलिसांकडून मार खाल्ला. प्रामाणिक राहिल्यानंतर हे दिवस बघायला मिळाले. एका बाजूने समाजात कुचंबना आणि दुसरीकडे पक्षात अस्थिर वातावरण. माझ्या सारख्या आर्थिक परिस्थिती नसलेल्या कार्यकर्त्याने आता कुठे आणि कोणाकडे भावना मांडाव्यात? माझा राजीनामा मी खूप जड अंतकरणाने आपल्याला सोपवत आहे. 


16 वर्षात आजच आपल्याला अजान, मशीद, मदरसे यांच्यावर अचानक संशय का आला? असा प्रश्न उपस्थित करत, "आम्ही तुमच्या सोबत असताना या गोष्टी बोलला असता तर आम्ही याचा सोक्षमोक्ष आपल्या समोर केला असता. आपण आपल्या बाजूने चुकला नसाल. परंतु, आमच्या बाजूने काही तरी भयंकर घडणार याचा प्रत्यय येत आहे. तरी आपण मी दिलेला राजीनामा स्वीकारावा. गेलेला काळ आणि आपले संबंध मी विसरू शकणार नाही, असे शेख यांनी म्हटले आहे.  


महत्वाच्या बातम्या 


गुढीपाडव्याच्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा


Maharashtra News : जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदीसाठी बाबासाहेब पुरंदरेंचं पत्र शरद पवारांना माहिती नव्हतं का? : मनसे