पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला. पक्ष स्थापनेच्या 60 वर्षांनंतरही भाजपला उमेदवार मिळत नाही, इतरांचे उमेदवार पळवतात, असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपवर निशाणा "1952 ला पक्ष स्थापन होऊनही भाजपला उमेदवार मिळत नाहीत. म्हणून ते इतरांचे उमेदवार पळवतात. आता झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणूकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आयात करुन भाजपने विजय मिळवला आणि तुम्ही दाखवलं की भाजपची सरशी.", असा घणाघात राज ठाकरेंनी भाजपवर केला. नोटाबंदीवरुन मोदींवर टीका "नोटाबंदीचा निर्णय फसला आहे, हे पंतप्रधान मोदींच्या 31 डिसेंबर 2016 च्या भाषणातील बॉडी लँग्वेजवरुन दिसत होतं.", असे म्हणत राज ठाकरेंनी मोदींसह नोटाबंदीवर टीका केली. शिवाय, "नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींनी म्हटलं की गरोदर महिलांना 6500 रुपये देणार. हा कुठला कार्यक्रम काढला लोकसंख्या वाढवण्याचा?", असा सवालही केला आहे. राम मंदिराचा मुद्दा "ज्या मुद्द्यावर संघर्ष करुन, इतक्या लोकांचा जीव गेला, सत्ता हातात आल्यानंतर भाजपला राम मंदिर उभारता येत नाही. फक्त रेल्वे स्थानकाला नावं देत आहेत.", अशी टीका राज ठाकरेंनी भाजपवर केली. शिवस्मारकावरुन राज ठाकरेंचा घणाघात "जयंत्या, पुण्यतिथ्या सोडल्यास पुतळ्यांजवळ कोण जातं तिथे? शिवस्मारकाचा खर्च गड-किल्ल्यांवर करा.", असे राज ठाकरे म्हणाले. शिवाय, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही मोठं शिवस्मारक असेल, असं सांगितलं जातंय, मात्र स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दगडी खडकावर उभं आहे, हे समजून घ्या, असेही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे : - स्थानिकांनाच रोजगार देण्याची राज्य सरकारची भूमिका का नाही? - राज ठाकरे - मनसेच्या आंदोलनांमुळे मोबाईलमध्ये मराठीला प्राधान्य - राज ठाकरे - देशातील सर्व राज्य भाषेवर आधारित आहेत - राज ठाकरे - सत्ता हातात असून भाजपला राम मंदिर उभारता येत नाही, फक्त रेल्वे स्थानकाला नावं देतायेत - राज ठाकरे - ज्या संघर्षामुळे निवडून आले, त्या राम मंदिराचा मुद्दा बाजूलाच ठेवला गेलाय - राज ठाकरे - मनमोहन सिंह यांचं सरकार असताना देशात काहीच घडलं नाही असं नाही, भरपूर गोष्टी घडल्या - राज ठाकरे - फडणवीस कल्याणला साडेसहा हजार कोटी देणार होते, कुठे आहेत? दिले? नाही दिले - राज ठाकरे -  स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दगडी खडकावर उभा आहे, हे समजून घ्या - राज ठाकरे - जयंत्या, पुण्यतिथ्या सोडल्यास पुतळ्यांजवळ कोण जातं तिथे? - राज ठाकरे - भाजपच्या लोकांना घोषणा करण्याची सवय आहे - राज ठाकरे - शिवस्मारकाचा खर्च गड-किल्ल्यांवर करा - राज ठाकरे - नोटाबंदी फसल्याचं मोदींकडून पाहून कळतं - राज ठाकरे - भाजपला अजूनही महाराष्ट्रात उमेदवार सापडत नाहीत - राज ठाकरे - पुण्यात भाजपला जी काही मतं मिळतील, ती गिरीश बापटांसाठी मिळणार आहेत?, मोदींच्या नावाने मिळतात - राज ठाकरे - राज्य सरकार जेवढ्या घोषणा करतंय, तेवढे पैसे तरी आहेत का? - राज ठाकरे - उमेदवारच सापडत नाहीत, अशी माझ्यावर कधीच वेळ आली नाही - राज ठाकरे - 60 वर्षांनंतरही भाजपला उमेदवार मिळत नाहीत - राज ठाकरे