ठाण्यात सेनेकडे युतीचा प्रस्ताव नेणार नाही, भाजपची भूमिका
एबीपी माझा वेब टीम | 02 Jan 2017 06:55 PM (IST)
ठाणे : शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या कुरबुरी कायम असल्याचं चित्र वारंवार समोर येत आहे. किमान ठाण्यात तरी युतीचा कुठलाही प्रस्ताव घेऊन जाणार नसल्याचं भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. ठाण्यात शिवसेनेबरोबर युती व्हावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा नाही, त्यामुळे आम्ही सेनेकडे युतीचा प्रस्ताव घेऊन जाणार नाही, असं भाजप आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे युतीच्या तुटीचा पहिला घाव ठाण्यात पडल्याचं पाहायला मिळत आहे.