मुंबई : पालिकेतल्या टक्केवारीनंच मंगळवारच्या पावसात मुंबईची दैना झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. दादरच्या ब्राह्मण सेवा मंडळाकडून राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आणि उदय तानपाठक यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वादापासून आरक्षणापर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर त्यांनी आपली मतं व्यक्त केली.


‘मुंबईची सर्वाधिक वाट टक्क्यांच्या राजकारणाने लावली. त्याचबरोबर बाहेरच्या लोंढ्यांनी मुंबई अधिक बकाल झाली. त्यामुळे मोदींनी आधी मनपा, मंत्रालयातील साफसफाई करावी.’ अशी जोरदार टीका राज ठाकरेंनी केली.

‘...तर आरक्षणाची गरजच नाही’

‘महाराष्ट्रात तयार होणाऱ्या नोकऱ्यांत मराठी मुला-मुलींना प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच नाही. जो आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे त्याला आरक्षण द्यावं असं माझं ठाम मत आहे.’ अशी रोखठोक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली.

‘मी हात पुढे केला होता, पण…’  

मनसे-शिवसेना भविष्यात एकत्र येणार का? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ‘मी हात पुढे केला होता. पण त्यांनी हाताला फक्त गुदगुल्या केल्या.’ दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली. भाजप शिवसेनेला किंमत देत नाही हे शिवसेनेला कळायला हवं.

‘कोणी काय खावं हे सरकारने ठरवू नये!’

‘कोणी काय खावं हे सरकारने किंवा इतर कोणीही ठरवू नये. पर्यूषणचा काळ आहे म्हणून कत्तलखाने चालवू नका. हे म्हणणं चुकीचं आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देणारं महाराष्ट्र हे राज्य आहे. गुजराती माणूस इथे व्यापार करायला आला कारण इथे पोषक वातावरण आहे.’ असं म्हणत राज ठाकरेंनी यावेळी पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या मुद्द्यावर निशाणा साधला.

‘राजकीयदृष्ट्या राहुल गांधी जोवर अस्तिवात आहेत तोवर भाजप अस्तिवात असेल.’ अशी मार्मिक टीकाही यावेळी राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि भाजपवरही केली.

राज ठाकरेंच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे :

संघटना बांधणीत मी नेत्यांना दूर ठेवलं हे म्हणणं चुकीचं आहे : राज ठाकरे

टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली : राज ठाकरे

बाहेरच्या लोंढ्यांनी मुंबई अधिक बकाल झाली : राज ठाकरे

पाणी तुंबल्यानंतर मुंबईची चर्चा होतो, तोवर मुंबईकडे कुणाचंही लक्ष नसतं : राज ठाकरे

मोदींनी आधी मनपा, मंत्रालयातील साफसफाई करावी : राज ठाकरे

मी हात पुढे केला होता, पण हाताला गुदगुदल्या केल्या : राज ठाकरे

महापुरुष जातीमध्ये विभागले गेले आहेत, आता देवही जातीमध्ये विभागले जात आहेत : राज ठाकरे

घरी गणपती आणण्याची प्रथा फार पूर्वी कोकणात होती पेशव्यांच्या सोबतीनं ही प्रथा घाटावर आली : राज ठाकरे

त्यानंतर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती सुरु केला : राज ठाकरे

महाराष्ट्रात तयार होणाऱ्या नोकऱ्यांत मराठी मुला-मुलींना प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच नाही : राज ठाकरे

आरक्षणाची गरजच नाही, जो आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे त्याला आरक्षण द्या : राज ठाकरे

माझ्या हातात सत्ता द्या, मी दाखवतो पूर्णवेळ कसं राजकारण करतात : राज ठाकरे

बाप्पाच्या कृपेने अमितचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत, त्याची प्रकृती उत्तम आहे : राज ठाकरे

भाजप शिवसेनेला किंमत देत नाही हे शिवसेनेला कळायला हवं : राज ठाकरे

पर्युषण आहे म्हणून कत्तलखाने बंद करणं हे चुकीचं : राज ठाकरे

कोणी काय खावं हे सरकारने किंवा इतर कोणीही ठरवू नये : राज ठाकरे

किरीट सोमय्या आता का व्होटिंग मशीनबद्दल बोलत नाही? : राज ठाकरे

राजकीयदृष्ट्या राहुल गांधी जोवर अस्तिवात आहेत तोवर भाजप अस्तिवात असेल : राज ठाकरे

मी परमेश्वराकडे मागणं मागतो की हे राज्य माझ्या हातात येवो आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडो : राज ठाकरे

VIDEO :