मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये आज पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या संस्थेने ही माहिती दिली आहे.
सध्या, कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात निर्माण झाला असून उत्तर मध्य-महाराष्ट्रावराही चक्रवाती परिस्थिती कार्यरत आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि कोकण तसंच गोवा येथे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच बहुतांश ठिकाणी हवामान ढगाळ राहील.
याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गारपिटीचीही शक्यता आहे, ज्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या काळात मुंबईत देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुरुवारी (15 मार्च) उत्तर-मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, पुणे, मुंबई आणि नाशिक इथे काही प्रमाणात पाऊस झाला. पावसामुळे तापमानात घट झाल्याने नागरिकांची उकाड्यातून काहीशी सुटका झाली आहे.
शेतकऱ्यांनी शेतमालाची काळजी घ्यावी. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता असल्याने कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीची शक्यता : स्कायमेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Mar 2018 07:54 AM (IST)
याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गारपिटीचीही शक्यता आहे, ज्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या काळात मुंबईत देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -