मुंबई : मध्य रेल्वेकडून (Central Railway) रविवारी (8 मे) माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.10 या वेळेत  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर लाईन सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी त्याच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.


माटुंगा - मुलुंड  अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05  ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत


माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते सायंका 4.05 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25  ते दुपारी 3 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याच्या पलीकडे या जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.


ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत


सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वाटे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10  ते सायंकाळी 4.10 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी 11.16  ते दुपारी 4.47  वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.


पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53  ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बरमार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45  ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुला (प्लॅटफॉर्म क्र. दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.


हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. हे देखभाल मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.  या कालावधीत प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रशासनाकडून दिलगीर व्यक्त करण्यात आली आहे. उद्या असणाऱ्या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था करण्याचं आवाहन करण्यात आलंय.