मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना रेल्वे अधिकाऱ्यांनी दुय्यम वागणूक दिल्याची माहिती समोर येत आहे.


 

प्रोटोकॉलनुसार रामदास आठवलेंना एसी फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्याची सुविधा आहे. मात्र, तरीही काल त्यांना एसी टू टायर मध्ये बसवण्यात आलं. काल सांगली जात असताना महालक्ष्मी  एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला. दरम्यान, आठवलेंनी सांगलीपर्यंत टू टायरमधूनच प्रवास केला.

 

रेल्वे मंत्रालयाकडून आठवलेंच्या या प्रवासाबाबत माहिती देण्यात आली होती. तरीही त्यांची एसी फर्स्ट क्लासमध्ये सोय करण्यात आली नसल्याचं समजतं आहे.

 

रामदास आठवलेंनी याप्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार केलेली नाही. मात्र घडल्या प्रकाराबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, याप्रकरणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू नेमकी संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.