मुंबई: कर्जबुडव्या विजय मल्ल्या विरोधात आता अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल आहे. मल्ल्यासोबतच किंगफिशर एअरलाईन्सचा सीईओ संजय अग्रवाल याच्याविरोधातही वॉरंट जारी करण्यात आलं आहे.


 

1000 कोटींचा सेवा कर चुकवल्याप्रकरणी हे वॉरंट कोर्टाकडून जारी करण्यात आलं आहे. मात्र, मल्ल्या सध्या भारताबाहेर आहे.

 

दरम्यान, विजय मल्ल्याची संपत्ती अखेर जप्त करण्यात आली आहे. मुंबई, बंगळुरूतल्या 6 हजार 630 कोटींच्या संपत्तीवर ईडीनं जप्ती आणली आहे.

 

स्टेट बँकेच्या तक्रारीनंतर विजय मल्ल्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. 17 हून अधिक बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्यांना विशेष न्यायालयाने फरार घोषित केलं आहे.

 

याआधी आयडीबीआय बँकेच्या प्रकरणात ईडीने जून 2016 मध्ये विजय मल्ल्यांची 1411 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. यामध्ये मुंबई आणि बंगळुरुमधील फ्लॅट आणि चेन्नईतील एका प्लॉटचा समावेश होता. दरम्यान, मल्ल्यांच्या फ्रान्समधील चार बँक खात्यांबाबतची माहिती समोर आली आहे.