मुंबई : रविवारी रेल्वेमार्गांची दुरुस्ती तसंच इतर कामासाठी लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. सकाळी 11 ते दुपारी. 4 पर्यंत मेगाब्लॉक घेणार आहे.


मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक : 

मध्य रेल्वेवर विद्याविहार ते भायखळा अप स्लो ट्रॅकवर स. 11.20 ते दु. 4.20 पर्यंत मेगाब्लॉक आहे. त्यामुळे घाटकोपर येथून जाणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते भायखळ्यापर्यंत अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्यांना कुर्ला, सायन, माटुंगा, परळ स्थानकावर दोनवेळा थांबा दिला जाईल. त्यानंतर त्या पुन्हा धीम्या मार्गावरून जातील. अप धीम्या लोकल विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी स्थानकांत थांबणार नाहीत. प्रवाशांना जर या स्थानकांवर प्रवास करायचे असल्यास घाटकोपर, कुर्ला, परळ, भायखळा या स्थानकांद्वारे प्रवास करता येईल.

लोकल किमान 10 मिनिटे उशिराने

सीएसएमटीहून सुटणाऱ्या फास्ट आणि स्लो लोकल स. 10.16 ते दु. 2.54 पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबवल्या जातील. कल्याणहून सुटणाऱ्या सर्व अप जलद, अर्धजलद लोकल स. 11.04 ते दु. 3.06 पर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात थांबतील. सीएसएमटीहून सुटणाऱ्या आणि सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या सर्व लोकल सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत किमान 10 मिनिटे उशिराने धावतील.

पश्चिम रेल्वेवरील मेगा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर रविवार माटुंगा ते मुंबई सेंट्रलमध्ये सकळी 10.35 ते दुपारी. 2.35 पर्यंत मेगाब्लॉक आहे. या कालावधीत सर्व फास्ट लोकल सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रल स्थानकात धीम्या मार्गावरून जातील. त्यामुळे काही फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत

पनवेलपर्यंतची सेवा खंडित

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर स. 11.10 ते दु. 4.10 पर्यंत ब्लॉक आहे. सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी लोकल सेवा स. 10.34 ते दु. 3.39 पर्यंत खंडित राहील. तसेच, पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल स. 10.21 ते दु. 3.41 पर्यंत खंडित राहील. या मार्गावरील प्रवाशांसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलसाठी विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.

सोमवारी गाड्यांच्या वेळांमध्ये बदल

एलटीटी-वाराणसी रत्नागिरी एक्स्प्रेस पहाटे 5.23 ऐवजी 7.10 वाजता सुटेल. एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस सकाळी. 6.35 ऐवजी सकाळी. 7.15 वाजता सुटेल. एलटीटी-दरबंगा एक्स्प्रेस दु. 12.15 ऐवजी दु. 2.10 वाजता सुटेल. एलटीटीच्या दिशेने येणाऱ्या काही मेल, एक्स्प्रेस गाड्या कल्याण येथे थांबवल्या जातील. या कालावधीत गाड्या अर्धा तास ते अडीच तास उशिराने धावतील.