मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे बोर्डानं पश्चिम रेल्वेला मडगाव- बांद्रा टर्मिनस- मडगाव ही एक्स्प्रेस सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसात ही एक्स्प्रेस सुरु होईल ती आठवड्यातून दोनवेळा धावणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही एक्स्प्रेस सुरु होणार असल्यानं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.  


बांद्रा टर्मिनस- मडगाव एक्स्प्रेस लवकरच सुरु होणार


मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणातल्या चारमान्यांच्या मागणी मान्यता देत रेल्वे बोर्डानं पश्चिम रेल्वेला बांद्रा- मडगाव एक्स्प्रेस सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. या आठवड्यातच ही एक्स्प्रेस सुरु होईल, अशी शक्यता आहे.


बांद्रा टर्मिनसवरुन ही एक्स्प्रेस सकाळी 6.50 मिनिटांनी सुटेल ती गोव्यातील मडगावमध्ये रात्री 10 वाजता पोहोचेल. मडगावरुन पुन्हा बांद्रा टर्मिनससाठी जाण्यासाठी एक्स्प्रेस सकाळी 7.40 वाजता सुटेल तर आणि बांद्रा टर्मिनसला रात्री 11.40 वाजता पोहोचेल. या एक्स्प्रेसला बोरिवली, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदूर्ग, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी या स्टेशनवर थांबा असेल.   


विशेष बाब म्हणजे  पश्चिम रेल्वे बांद्रा -मडगाव एक्स्प्रेस कायमस्वरुपी चालवणार आहे. बांद्रा येथून बुधवारी आणि शुक्रवारी मडगावसाठी ट्रेन सुटेल. बांद्रा येथून ट्रेन सकाळी 6.50 वाजता सुटेल बोरिवलीत 7 वाजून 23 मिनिटांनी पोहोचेल, मडगाव येथे ही ट्रेन त्याच दिवशी रात्री 10 वाजता असेल. तर, मडगाव येथून मंगळवार आणि गुरुवारी  ट्रेन बांद्रा टर्मिनससाठी सुटेल. सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी एक्स्प्रेस मडगावमधून सुटेल ती बांद्रा स्टेशनला रात्री 11 वाजून 40 मिनिटांना पोहोचेल. 


स्थानिकांच्या मागणीनंतर मडगाव- बांद्रा टर्मिनस- मडगाव एक्स्प्रेस सुरु करण्यात येत आहे. या एक्स्प्रेसचा फायदा बोरिवली, वसई आणि विरार येथील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी होणार आहे. ही एक्स्प्रेस सुरु झाल्यानं पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानक आणि कोकण रेल्वेमध्ये कनेक्टिव्हीटी वाढणार आहे. पश्चिम रेल्वेनं ही एक्स्प्रेस सुरु केली असली तरी कोकण रेल्वे मार्गावर या गाडीला आणखी थांबे देऊन इतर स्थानकांवर देखील ट्रेन थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मडगाव- बांद्रा टर्मिनस - मडगाव एक्स्प्रेसला एलएचबी कोच असतील. या एक्स्प्रेसमध्ये एकूण 20 कोच असतील.


या एक्स्प्रेसचा फायदा कुणाला?


पश्चिम रेल्वे प्रथमच वसई पनवेल या कॉरिडॉरचा वापर करुन बांद्रा टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस सुरु करणार आहे. यामुळं वसई, विरार आणि बोरिवली मधील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी फायदा होणार आहे. 


 इतर बातम्या :


Western Railway : गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गुड न्यूज, पश्चिम रेल्वे लवकरच बांद्रा ते मडगाव एक्स्प्रेस सुरु करणार